कंपनीच्या सकल उत्पन्नातून द्यावयाच्या कपाती

(करनिर्धारण वर्ष २००९-१०)

१. कलम 80 G .वेगवेगळया संस्थांना देणगी बद्दल कपात -

अ) मर्यादा नसलेल्या देणग्या - कपातीचा दर १००%
१) राष्ट्रीय सुरक्षा निधी
२) पंतप्रधान राष्ट्रीय सहायता निधी
३) पंतप्रधान अर्मेनिया भूकंप सहायता निधी
४) आफ्रिका निधी
५) जातीय सलोख्यासाठी राष्ट्रीय प्रतिष्ठान
६) राष्ट्रीय हितासाठी स्थापन झालेल्या अधिकृत शैक्षणिक संस्था/विद्यापीठ यांना देणगी
७) महाराष्ट्र मुख्यमंत्री सहायता निधी.
८) जिल्हा साक्षरता समितीला देणगी.
९) राष्ट्रीय/राज्य रक्तपेढीला देणगी.
१०) गरीबांना वैद्यकीय सोयी, सवलती देण्यासाठी राज्य सरकारद्वारे स्थापीत निधी.
११) स्थल, वायु सेना आणि जलसेना सहायता कल्याण निधी.
१२) आंध्रपदेश मुख्यमंत्री वादळ सहायता निधी.
१३) रोगांचा राष्ट्रीय सहायता निधी.
१४) मुख्यमंत्री किंवा लेफ्टनंट गव्हनर सहायता निधी.
१५) केंद्र सरकारने स्थापन केलेला राष्ट्रीय खेळ निधी.
१६) केंद्र सरकारद्वारा स्थापित राष्ट्रीय सांस्कृतिक निधी.
१७) केंद्र सरकारद्वारा स्थापित राष्ट्रीय प्रौद्योगिक विकास आणि उपयोजन निधी.
१८) गुजरामधील भुंकपग्रस्त व्यक्तीच्या सहायासाठी गुजरात सरकारने स्थापन केलेला निधी.
१९) राष्ट्रीय स्वपरायणता, प्रमस्तिष्क घात, मानसिक मंदता, आणि अति अशक्तताग्रस्त व्यक्ती कल्याण न्यास. (ट्रस्ट)

ब) मर्यादा नसलेल्या देणग्या - कपातीचा दर ५०%
१) जवाहरलाल नेहरू स्मृती निधी.
२) पंतप्रधान दुष्काळ निवारण निधी.
३) राष्ट्रीय बाल निधी.
४) इंदिरा गांधी स्मृती निधी.
५) राजीव गांधी फाउंडेशन.
क) मर्यादा असलेल्या देणग्या - कपातीचा दर १००%
मर्यादा :- सकल उत्पन्नातून करमुक्त उत्पन्न, दीर्घकालीन पुंजीलाभ, 80 च्या इतर कपाती वजा केल्यावर येणाया रक्कमेच्या १०% किंवा प्रत्यक्ष देणगी यापैकी जी रक्कम कमी असेल त्या रक्कमेवर कपात मिळते.
१) कुटुंब नियोजनाचे कार्य व हित यासाठी कार्यरत असणाया स्थानिक स्वराज्य संस्थेने किंवा सरकारने स्थापन केलेल्या संस्थांना देणगी.
२) प्रमंडळाद्वारे भारतीय ऑलम्पिक असोशिएशन किंवा केंद्रसरकारद्वारे स्थापित क्रीडा संघ अथवा संस्थेला खालील कार्यासाठी देणगी.
३)भारतात क्रीडा आणि खेळाच्या पायाभूत विकासाकरिता देणगी.
४)भारतात क्रीडा आणि खेळाच्या प्रायोजनासाठी देणगी.

ड) मर्यादा असलेल्या देणग्या - कपातीचा दर ५०%
१) कुटुंबनियोजना व्यक्तिरिक्त स्थानिक स्वराज्य संस्थेने उभारलेल्या धर्मदाय संस्थांना देणगी.
२) नोंदणीकृत देऊळे, मशिदी, गुरुद्वारा, चर्च इत्यांनादी देणगी.
३) पुण्यार्थ कार्यासाठी भारतात स्थापन झालेल्या निधीला किंवा संस्थेला देणगी.
४) अल्पसंख्यांकांच्या हिताकरिता केंद्र अथवा राज्य सरकारने स्थापन केलेल्या मंडळाला देणगी.
५) घर बांधणी किंवा शहरे व गावांचा योजनाबध्द विकास किंवा सुधारणा करण्यासाठी वैधानिक संस्थांना देणगी.
६) केंद्र सरकार आणि राज्य सरकारने ऐतिहासिक किंवा कलात्मक दृष्टा महत्वपूर्ण किंवा संपूर्ण राज्याच्या दृष्टीने सार्वजनिक पुजेचे स्थान म्हणून घोषित केलेल्या संस्थांना देणगी.
७) एखादी संस्था किंवा एखादा निधी सार्वजनिक धर्मादाय स्थापन अधिनियम १८६० नुसार किंवा प्रमंडळ अधिनियम १९५६ च्या कमल २५ नुसार झालेला असेल किंवा शासनमान्य शैक्षणिक संस्था विद्यापीठ असेल किंवा क्रिकेट, हॉकी, फुटबॉल, टेनिस अथवा केंद्र सरकारद्वारा अधिकृत खेळाचे नियंत्रण-निरीक्षण करण्यासाठी स्थापन झालेली संस्था असेल तर अशा संस्थेला दिलेली देणगी.
(टीपः दिलेल्या देणग्या रोख स्वरुपात असाव्यात (वस्तुच्या रुपात नसाव्यात.) तसेच दिलेल्या देणग्या एखाद्या विशिष्ट जाती किंवा धर्माच्या हिताकरीता नसाव्यात. (अनुसूचित जाती-जमाती, मागासवर्गीय जाती, स्त्रिया आणि मुले यांना विशिष्ट जाती धर्माचे समजण्यात येत नाही.)

२. कलम 80 GGA वैज्ञानिक संशोधन किंवा ग्रामीण विकासाकरिता दिलेल्या देणगीबद्दल कपात -

करदात्याने खालील संस्थांना दिलेल्या देणगीच्या संपूर्ण रकमेची कपात मिळते म्हणजेच देणगी ची १००% रक्कम कपाती योग्य असते.
अ) कोणत्याही मान्यताप्राप्त वेैज्ञानिक संशोधन संस्था, विद्यापीठ, महाविद्यालय, इत्यादींना
वैज्ञानिक संशोधनासाठी गतवर्षात दिलेली देणगी.
ब)कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ, महाविद्यालय किंवा संस्थेला समाजातील विज्ञान किंवा सांख्यीकीय विज्ञानाच्या संशोधनासाठी गतवर्षात दिलेली देणगी.
क) केंद्रसरकार द्वारे सूचित संस्थेला ग्रामिण विकास कार्यासाठी करदात्याने गतवर्षात दिलेली रक्कम.
ड) केंद्र सरकारद्वारे स्थापन केलेल्या ÷नगराच्या गरिबीला दूर करण्याकरिता राष्ट्रीय निधी' ला दिलेली देणगी.
इ) सार्वजनिक क्षेत्रातील कंपणी किंवा संस्थेला एखादी परियोजना चालू करण्यासाठी दिलेली राशी ज्यापासून जनतेचे सामाजिक कल्यान होईल.
टीपः जर करदाता व्यापार किंवा व्यवसायापासून लाभ आणि प्राप्ती या कर देण्यास जबाबदार असेल तर मात्र त्याला कलम80GGAच्या अंतर्गत कोणत्याही प्रकारची कपात मिळणार नाही.

३.कलम 80 GGB. भारतीय प्रमंडळाने राजकीय पक्षाला दिलेले अशंदान -

अशंदानाची रक्कम भारतीय प्रमंडळ अधिनियम १९५६ च्या कलम २९३ A मध्ये ठरविल्या रक्कमेपेक्षा अधिक नसल्यास-१००%

४.कलम 80 IA पायाभूत विकास उपक्रमातील लाभासंबंधी कपात -

सडक, पूल, रेलतंत्र, दूर संचार सेवा, पाणीपुरवठा योजना, सिंचन योजना, आंतर्देशीय जलमार्ग, वायुमार्ग, विद्युत उत्पादन इ. आधारभूत सेवांच्या विकास उपक्रमातील लाभाकरिता पुढील प्रमाणे कपात मिळते.
I दूरसंचार सेवा ५ करनिर्धारण वर्षापर्यंत - लाभाच्या १००%
नंतर ५ करनिर्धारण वर्षासाठी - लाभाच्या ३०%
II इतर सेवा -१० करनिर्धारण वर्षापर्यंत - लाभाच्या १००%

५.कलम 80 IAB - SEZ Development करीता-

१० वर्ष कर निर्धारण वर्षापर्यंत १००%

६. कलम 80 IB गैर पायाभूत उपक्रम हॉटेल इ.च्या लाभासंबंधी कपात -

भारतात नोंदणी झालेल्या कं.द्वारे चाललेल्या जाणाया ५ लक्ष भांडवल असलेल्या ३१.३.१९९७ च्या नंतर परंतु १.४.२००१ च्या पूर्वी कार्य सुरु करणाया संपूर्ण नवीन हॉटेलच्या बाबतीत.
प्रथम १० करनिर्धारण वर्षापर्यंत -
१) पहाडी, ग्रामीण, अथवा तीर्थक्षेत्री स्थापन हॉटेलचा लाभ - ५०%
२) अन्यठिकाणी स्थापन हॉटेलचा लाभ - ३०%
कलकत्ता चेन्नई दिल्ली मुंबईच्या हॉटेलसाठी ही कपात मिळणार नाही.

ब)औद्योगिक उपक्रमाच्या बाबतीत -
८ व्या सुचीत वर्णन केलेल्या मागास राज्यात अथवा मागास संघीय क्षेत्रात स्थापन झालेल्या आणि १. ४ . १९९३ नंतर परंतु १. ४ . २००४ पूर्वी (जम्मूकाश्मिरच्या बाबतीत ३१.३.२०१२ पर्यंत) उत्पादन किंवा शीतगृह सुरु केले असेल तर
१) प्रथम ५ क.नि.वर्षापर्यंत - १००%
२) नंतरच्या ५ क.नि.वर्षाकरिता - (सहकारी समिती - ७ क.नि. वर्षाकरिता)
उपक्रम कंपनी असल्यास - ३०%
अन्य असल्यास - २५%
३१.३.१९९९ नंतर परंतु १.४.२००४ पूर्वी कृषी उत्पन्नाकरिता शीतागार शृंखला स्थापन झाल्यास किंवा ३१.३.२००१ च्या नंतर खाद्यान्न उठाई, भराई, भंडारण, परिवहन, व्यवसायातील लाभाकरिता वरील प्रमाणेच कपात मिळेल.
क) वैज्ञानिक तथा औद्योगिक अनुसंधान कार्य करणारी कंपनी असल्यास -
३१.३.२००० नंतर परतु १.४.२००७ पूर्वी अनुमोदीत आणि भारतात नोंदणी झालेल्या कंपनीच्या बाबतीत -
प्रथम १० क.नि.वर्ष . १००%
ड) खनिज तेल उत्पादनाच्या बाबतीत -
पूर्वोत्तर क्षेत्रात केव्हाही, उर्वरित भारतात कोठेही ३१.३.१९९७ नंतर उत्पादन प्रारंभ झाल्यास -
प्रथम ७ क.नि. वर्षापर्यंत - १०० %

इ) Multiplex Theatre किंवा Convention केंद्राच्या लाभाबाबत -३१.३.२००२ नंतर पंरतु १.४.२००५ पूर्वी संपूर्णपणे नवीन स्थापन झाल्यास -
प्रथम ५ क.नि.वर्षापर्यंत - ५०%
फ) ग्रामीण क्षेत्रातील रुग्णालयाच्या लाभाबाबत-
३०.९.२००४ नंतर परंतु १.४.२००८ पूर्वी १०० खाटांच्या असलेल्या आणि हिसेब अंकेक्षित करुन घेणाया रुग्णालयाबाबत -
प्रथम ५ क.नि.वर्षापर्यंत - १००%
८ व्या अनुसूचीनूसार मागास राज्ये तथा मागास संघीय क्षेत्र-
अरुणाचल प्रदेश, आसाम, गोवा, हिमाचल प्रदेश, जम्मु-काश्मिर, मणिपूर, मेघालय, मिजोरम, नागालॅंड, सिक्किम, त्रिपुरा, अंदमान-निकोबार, दादरा-नगर हवेली, दमन-दिव,लक्षद्विप, पॉंडेचरी,
पूर्वोत्तर क्षेत्र - अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिजोरम, नागालॅंड, सिक्किम, त्रिपूरा.

७. कलम 80 IC काही विशेष राज्यात स्थापन झालेल्या उपक्रमांबाबत कपात -

पायाभूत विकास केंद्र किंवा आद्योगिक संवर्धन केंद्र किंवा संपदा किंवा औद्योगिक पार्क सॉफ्टवेअर प्रौद्योगिकी पार्क किंवा औद्योगिक क्षेत्र किंवा थीम पार्क मध्ये एखाद्या वस्तुचे उत्पादन केल्या जात असेल किंवा १४ व्या अनुसुचित वर्णन केलेल्या वस्तुचे उत्पादन करदाता करीत असेल तर-
. सिक्कीम राज्यात २२.१२.२००२ नंतर १.४.२००७ पूर्वी केलेल्या उत्पादनाच्या बाबतीत -१० करनिर्धारण वर्षापर्यंत. १००%
. अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिजोरम, नागालॅंड आणि त्रिपूरा राज्यात २३.१२.१९९७ नंतर परंतु १.४.२००७ पूर्वी वस्तुचे उत्पादन केल्या जात असेल तर-१० करनिर्धारण वर्षापर्यंत- १००%
. हिमाचल प्रदेश, उत्तरांचल राज्यात ०६.०१.२००३ नंतर १.४.२०१२ पूर्वी केलेल्या उत्पादनाच्या बाबतीत.
प्रथम ५ करनिर्धारण वर्षापर्यंत- १०० %
नंतरच्या ५ करनिर्धारण वर्षापर्यंत- ३०%

८.कलम 80 ID दिल्ली, फरिदाबाद, गुडगांव, गौतम बुद्ध नगर, गाजियाबाद, जिल्हयात स्थापन हॉटेल आणि कनव्हेंशन केंद्राच्या लाभाबाबत-

३१.३.२००७ नंतर परंतु १.४.२०१० पूर्वी संपूर्णपणे नव्याने स्थापन २, ३, ४ स्टार हॉटेल किंवा कनव्हेंशन केंद्र -
प्रथम ५ करनिर्धारण वर्षापर्यंत - १००%

९.कलम 80 IE - पूर्वोत्तर राज्यात स्थापन उपक्रमाबाबत -

३१.३.२००७ नंतर परंतु १.४.२०१७ पूर्वी पूर्वोत्तर राज्यात स्थापन झालेला उपक्रम वस्तू उत्पादनाचे कार्य किंवा मान्य व्यवसाय करित असल्यास -
प्रथम १० क.नि.वर्षापर्यंत १००%
मान्य व्यवसाय - कमीत कमी २ स्टार हॉटेल रोपवेसह साहसिक खेळ, २५ खाटांचे नर्सिंग होम, वृध्दाश्रम, आय.टी.ट्रेनिंग केंद्र, आय.टी. हार्डवेअर निर्मिती, जैवतंत्रज्ञान, Hotel management,catering and food carft ; , Nursing and para medical Civilaviation; , Fashion designing; , Industrial training; Entrepreneurship devevelopment. संबंधी व्यावसायिक प्रशिक्षण संस्था चालविणे.

१०.कलम JJA - जैव-श्रेणीतील क्षेप्याच्या संग्रहण आणि प्रक्रिया व्यापारातील लाभ -

करदाता जैव-श्रेणीतील क्षेप्यापासून उर्जा उत्पादन, खत निर्मिती, बायोगॅस निर्मिती इत्यादी करीत असेल तर- व्यवसाय आरंभापासून -५ करनिर्धारण वर्षापर्यंत-१००%

११. कलम 80 JJAA - नव्या नियमित कामगारांच्या नियुक्तीसंबधी कपात -

भारतीय प्रमंडळाने नियुक्त केलेल्या नव्या नियमित कामगारांच्या अतिरिक्त वेतनाच्या ३ करनिर्धारण वर्षापर्यंत ३०%

१२.कलम 80 LA बॅकेच्या अपतट(Offshore Banking Unit & International Financial Service Center) एककांच्या उत्पन्नासंबंधी कपात -
विशेष आर्थिक क्षेत्रात काम करणाया अशा एककांच्या परिवर्तनीय विदेशी मुद्रेत कमावलेल्या उत्पन्नाच्या बाबतीत-
१.प्रथम ५ करनिर्धारण वर्षाकरिता- उत्पान्नाच्या १००%
२.नंतरच्या ५ करनिर्धारण - उत्पन्नाच्या ५०%

0 comments:

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP